लिव्ह इन रिलेशनशीप मध्ये असलेले महाराष्ट्रातील सरकार जास्त काळ टिकणार असं वाटत नाही.- देवेंद्र फडणवीस

Devendra fadanvis statement on Maratha reservation

राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी एबीपी माझा या वृत्त वाहिनीला मुलाखतीत राज्यातील कोरोनाची परिस्थिति, महाविकास आघाडी सरकार आणि महाराष्ट्रचे व्हिजन याबद्दल आपले मत मांडले. यावेळी फडणवीस यांनी राज्यातील कोरोनाची परिस्थिती हाताळण्यास राज्य सरकार कमी पडत असून कोरोनाशी ज्या ताकदीने लढायला हवे, तेवढ्या ताकदीने राज्य सरकार कोरोनाशी लढत नाही. कोरोनाच्या मुंबईतील टेस्ट वाढवायला हव्या, पण टेस्टही वाढविण्यात येत नाहीत, देशात कोरोनाचा सर्वाधिक मृत्युदर महाराष्ट्रात असल्याचेही त्यांनी सांगितले.

फडणवीस यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील अंतर्गत मदभेदाबद्दल आणि सरकारच्या 5 वर्षीय कालखंडाबाबत राज्य सरकारला चिमटा काढला. या सरकारचे स्टेअरिंग कुणाच्या हाती आहे, हेच कळत नाही. हे सरकार लिव्ह इन-रिलेशनमध्ये आहे, कुटुंब नाही, त्यामुळे सरकार जास्त काळ टिकेल असे वाटत नाही, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.

केंद्र सरकारनेही मोठ्या प्रमाणात राज्याला मदत केली आहे. जीएसटीचे 19 हजार 200 कोटी रुपये आपल्याला मिळाले आहेत. आत्मनिर्भर पॅकेजमधून जवळपास 28 हजार कोटी रुपये आपल्याला मिळू शकतात. त्यामुळे आता हातपाय गाळून चालणार नाही, थोडी हिंमत दाखवावी लागणार आहे. काही पावलं उचलावी लागती. त्यातून अर्थव्यवस्था उभी राहू शकेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, आपल्याला कोरोना संदर्भातील व्हिजन आहेच. पण आपण आशावादी राहून कोरोना संपणार आणि पुन्हा अर्थव्यवस्थेला उभं करायचं आहे. या दृष्टीने तयारी केली नाही, तर उद्या सेवा क्षेत्रावर, उद्योगांवर जो काही परिणाम होणार आहे. त्यातून बाहेर पडणं अत्यंत अडचणीचं होणार आहे.’, असं फडणवीस म्हणाले.

शेती क्षेत्राच्या संदर्भात बोलतांना त्यांनी, खरीपाचा रब्बीचा माल आपण खरेदी करू शकलो नाही. शेतकऱ्यांना युरीया खतं मिळू शकली नाहीत. त्यावरून सांगतो की, यंदा आपल्या धरणांतील पाणीसाठी आणि एकूण पावसाची परिस्थिती पाहता त्यामुळे शेती क्षेत्रावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आतापासूनच व्यवस्थापनाची गरज असून त्यामुळे शेती क्षेत्र स्थिरावू शकतं. तसेच कोरोनाच्या संकटामुळे शहरातून ग्रामीण भागांत जी लोकं गेली आहेत. त्यांनाही रोजगार मिळू शकतो.’, असं म्हणत त्यांनी शेती क्षेत्राबाबतचं आपलं व्हिजन स्पष्ट केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *