संतापजनक. ! कोरोना टेस्टसाठी घेतला तरुणीच्या गुप्तांगाचा स्वॅब

Lab technician take private part swab for Corona test

करोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या २४ वर्षीय तरुणीच्या गुप्तांगातून स्वॅब घेतल्याची धक्कादायक आणि तितकीच संतापजनक घटना अमरावतीत उघडकीस आली आहे. मात्र, कोविड टेस्टसाठी अशा प्रकारे गुप्तांगातून स्वॅब घेत नसल्याचे समजल्यानंतर तिनं बडनेरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी लॅब टेक्निशियन असलेल्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

अमरावतीतील बडनेरा येथील कोविड टेस्ट लॅबमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. आपल्या सहकाऱ्याचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर पीडित तरुणीची करोना चाचणी करायची होती. त्यासाठी ती कोविड टेस्ट लॅबमध्ये गेली. त्यावेळी तेथील टेक्निशिअन तरुणाने तिच्या गुप्तांगातील स्वॅब घेतला. मात्र, करोना चाचणीसाठी गुप्तांगातून स्वॅब घेत नसल्याचं तरुणीला डॉक्टरांमार्फत समजले. त्यानंतर तिनं पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार दिली. यावरून त्याच्याविरोधात बलात्कार आणि विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पेश देशमुख असं या ३० वर्षीय आरोपीचं नाव आहे तो अमरावतीतील पुसदा येथील रहिवासी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *