सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त हॅण्डवॉश स्टेशन मास्क व सेनेटायजर चे वितरण.

महाराष्ट्र राज्याचे माजी अर्थ ,नियोजन व वनमंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त राजुरा पंचायत समिती येथे हॅण्डवॉश स्टेशन ,मास्क व सेनेटायजर चे वितरण करण्यात आले. यावेळी सुनील उरकुडे ,सभापती, कृषी व पशुसंवर्धन जी.प. चंद्रपूर तथा तालुका अध्यक्ष भाजपा, सतीश धोटे, भाजपा नेते , वामन तूरानकर ,उपसरपंच नोकारी (खु. ), सुरेश रागिट ,मंगेश श्रीराम, ओमप्रकाश रामावत,संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती राजुरा, अमित महाजणवार विस्तार अधिकारी पं.स.राजुरा, आदिंची प्रामुख्याने उपस्थिति होती.

वामन तूरानकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या हॅण्डवॉश स्टेशन आणि इतर साहित्याचे वाटप करण्यात आले. काही अंगणवाडी ,जी.प.शाळा यांना देखील या साहित्याचे वाटप करण्यात आले असून सुधीर मुनगंटीवार यांचा वाढदिवस सेवाकार्य करून व अत्यंत आवश्यकता असलेल्या साहित्याचे वाटप करून साजरा करण्यात आला. तूरानकर हे आपल्या अभिनव उपक्रम व सेवाकार्यासाठी परिसरात चांगलेच प्रसिध्द आहेत. राजकारणासोबत आपली सामाजिक कर्तव्य जोपासत समाजसेवा हीच खरी ईश्वरसेवा माननारे तूरानकर आपल्या परिसरातील लोकांसोबतच इतरांच्याही हाकेला धावून जातात हे विशेष आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *