दहावीचा निकाल जाहीर, ९५.३० टक्के विद्यार्थी पास

SSC Result report in Maharashtra

दहावीचा निकाल आज जाहीर झाला असून गतवर्षीच्या तुलनेत निकालात १८.२० टक्के वाढ झाली आहे. विद्यार्थ्यांसाठी ही मोठी दिलासादायक बाब आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. राज्यातल्या नऊ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा घेण्यात आली. एकूण ९५.३० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण बोर्डाची टक्केवारी सर्वाधिक आहे. राज्यातील ८,३६० शाळांचा निकाल १०० टक्के लागलेला आहे. एकूण १७ लाख ९ हजार २६४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी १५ लाख १ हजार १०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

विभागनिहाय टक्केवारी

कोकण – ९८.७७ टक्के

पुणे- ९७.३४ टक्के

कोल्हापूर -९७.६४ टक्के

अमरावती – ९५.१४ टक्के

नागपूर – ९३.८४ टक्के

मुंबई- ९६.७२ टक्के

लातूर – ९३.०७टक्के

नाशिक – ९३.७३ टक्के

औरंगाबाद – ९२ टक्के

राज्यात एकूण २४२ असे विद्यार्थी आहेत, की ज्यांनी या परीक्षेत १०० टक्के गुण मिळवले आहेत. लातूरच्या केशवराज विद्यालयातील २५ तर देशिकेंद्र विद्यालयातील २२ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवत दहावीच्या परीक्षेत यश मिळवलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *