निकाल दहावीचा ! तुमचा निकाल बघा एका क्लिक वर

SSC result in one click

आज दुपारी एका वाजता १० वीचा निकाल जाहीर होणार असून हा निकाल तुम्ही एका क्लिक वर पाहू शकता. दहावीच्या परीक्षेसाठी राज्यभरातून १७ लाख ६५ हजार ८९८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. मागच्या वर्षी ८ जूनला दहावीचा निकाल लागला होता.

निकाल पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

mahresult.nic.in

sscresult.mkcl.org

maharashtraeducation.com

कसा पहायचा निकाल ?

निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी वर दिलेल्या कोणत्याही वेबसाईटवर जा.

त्यानंतर तुम्हाला SSC BOARD RESULT नावाचा ऑप्शन दिसेल.

त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा सीट नंबर स्पेसशिवाय टाईप करावा लागेल.

त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षर टाकावी लागतील. म्हणजेच समजा तुमचा नंबर Z123456 असा असेल आणि तुमच्या आईचे नाव शारदा असेल, तर तुमच्या पहिल्या रकान्यात Z123456 हा सीट नंबर येईल आणि दुसऱ्या रकान्यात आईच्या नावाची पहिली तीन अक्षरे म्हणजेच SHA असे लिहावे लागेल.

यानंतर लगेचच तुम्हाला निकाल स्क्रीनवर दिसेल.

निकाल पाहिल्यानंतर तुम्हाला तो डाऊनलोडही करता येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना निकालाची प्रिंटआऊटही काढता येणार आहे.

बीएसएनएल मोबाइलधारकांना एसएमएसवर निकाल पाहता येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना MHHSC <space> <seat no> असा एसएमएस टाईप करुन 57766 वर पाठवावा लागणार आहे. त्यानंतर अवघ्या काही सेकंदात विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल एसएमएस सेवेद्वारे मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *