प्रतीक्षा संपली उद्या लागणार दहावीचा निकाल.

दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली असून उद्या 10 विचा निकाल जाहीर होणार आहे. दहावीच्या निकालाची तारीख जाहीर झाल्याने विद्यार्थी तसेच पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. उद्या (बुधवार, २९ जुलै) मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेचा म्हणजेच इयत्ता दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार असून मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार हा निकाल जाहीर केला जात असल्याचे कळवण्यात आले आहे. मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, अमरावती, लातूर, नाशिक, कोल्हापूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या अधिकृत संकेतस्थळावर उद्या (बुधवार) दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. निकाल जाहीर झाल्यावर शिक्षण मंडळाची अधिकृत वेबसाइट mahahsscboard.maharashtra.gov.in, mahresult.nic.in वर उपलब्ध होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *