सरकारने वीज बिलात सुट द्यावी,नाही तर आम्हाला खासगी कंपन्यांना झटका द्यावा लागेल.- राज ठाकरे

Raj Thakarey on uddhav Thakarey government

राज्यात वीज बिलाच्या मुद्यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. वीज प्रश्नावर राज्य सरकारचं दुर्लक्ष असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. भरमसाठ वीज बिलं म्हणजे सामान्यांच्या मोडलेल्या कंबरड्यांवर प्रहारच आहे, असंही राज ठाकरे यांनी पत्रात म्हटलं आहे. वीज बिलांच्या मुद्यावर मनसे गप्प राहील अशी चुकीची समजूत सरकारने करुन घेऊ नये, असा राज ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच इशारा दिला आहे.

मुख्यमंत्र्यांनी तात्काळ या विषयात लक्ष घालून वीजबिलात सूट द्यावी, नाही तर आम्हाला खासगी कंपन्यांना झटका द्यावा लागेल, असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

खासगी वीज कंपन्या असोत, महावितरण असो की बेस्ट असो सगळ्यांनी एकत्रितपणे राज्यातील वीजग्राहकांना वीजबिलांचा जबरदस्त शॉक दिला आहे. जून महिन्याची जी बिलं ग्राहकांना पाठवली गेली आहेत ती शब्दशः सामान्य माणसाचे डोळे पांढरे करणारी आहेत. जून महिन्याची जी बिलं ग्राहकांना पाठवली गेली आहेत ती शब्दशः सामान्य माणसाचे डोळे पांढरे करणारी आहेत. मार्च, एप्रिल, मे ह्या तीन महिन्यांची सरासरी वीज बिलं पाठवल्यानंतर त्या तीन महिन्यांत विजेचा झालेला वापर आणि सरासरी विजेची बिलं ह्यांच्यातील तफावत जून-जुलै महिन्यात ग्राहकांच्या माथी मारण्यात येत आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *