पबजी सह २७५ चिनी ऍपवर सरकार कडून बंदी घालण्याची शक्यता.

PubG and other Chinese app maybe banned by Indian government in future

गेल्या काही दिवसांपूर्वीच भारत सरकारने चीनच्या ५९ ऍपवर बंदी घातली होती. आता सरकारने पुन्हा २७५ चिनी ऍप ची यादी केली असून यामध्ये मोठ्या प्रमाणत लोकप्रिय असलेल्या पबजी गेमचा समावेश असल्याची समोर येत आहे.

भारतात चिनी इंटरनेट कंपन्यांचे तब्बल ३०० कोटी उपभोक्ते असून या ऍप द्वारे राष्ट्रीय सुरक्षेसाठी व गोपनीयतेसाठी धोकादायक आहे काय ? याबाबत सरकार कडून यादी करून तपासणी करत आहे. यामध्ये जर काही अनियमितता आढळल्यास पुन्हा चिनी ऍपवर बंदी घालण्यात येण्याची शक्यता आहे. जर अनियमितता आढळली नाही तर मात्र या ऍपवर बंदी घातली जाणार नाही.

गृहमंत्रालयाकडून अजून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया आली मात्र एका अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात आले की चिनी ऍपवर सतत आढावा घेण्यात येत असून त्यांना कुठून अर्थ सहाय्य होत आहे यांची माहिती घेण्यात येत रत सरकार आता ऍपसाठी नियम व कायदे तयार करत असून सायबर सुरक्षा अधिक बळकट करणे आणि भारतीय नागरिकांच्या डेटाला सुरक्षित ठेवणे ही एक सरकारची मोठी योजना आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *