दहावीचा निकाल कधी ? विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता.

ssc result updates

राज्यातील १२ वीच्या निकालानंतर १०वीच्या विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता लागली आहे. परंतु अद्यापही दहावीच्या निकालाची अधिकृत तारीख जाहीर न झाल्याने विद्यार्थी तसेच पालक वर्ग निराश झाले आहे. यावर्षी दहावीचा भूगोलचा पेपर कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे रद्द करण्यात आला होता. बाकीच्या विषयांमध्ये मिळालेल्या गुणांची सरासरी काढून त्याचं रुपांतर हे रद्द झालेल्या भुगोल पेपरच्या गुणांमध्ये करण्यात येणार असल्याचं जाहीर झालं आहे. यामुळे दहावीच्या गुणदानाचा तिढा सुटला आहे. यामुळे आता दहावीचा निकाल कधी लागतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी हिंगोलीमध्ये बोलतांना ३१ जुलैपूर्वी दहावीचा निकाल लागणार असे सांगितले होते. परंतु अद्याप दहावीच्या निकालाबाबत कोणतीही तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

देशात २४ मार्चपासून लॉकडाउन सुरू झाल्याने दहावीच्या उत्तर पत्रिका पोस्टामध्येच अडकून पडल्या होत्या. त्यामुळे कमी वेळात उत्तरपत्रिका तपासणी व संकलन हे मोठे आव्हान महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळासमोर होते. दहावीच्या परीक्षेसाठी राज्यभरातून १७ लाख ६५ हजार ८९८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. मागच्या वर्षी ८ जूनला दहावीचा निकाल लागला होता. यावर्षी दहावीचा निकाल कधी लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *