सुशांत सिंग राजपूतचा शेवटचा चित्रपट  ‘दिल बेचारा’ला चाहत्यांकडून तुफान प्रतिसाद

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूनंतर प्रदर्शित झालेल्या ‘ दिल बेचारा ‘ या चित्रपटाला त्याचा चाहत्यांकडून तुफान प्रतिसाद मिळत आहे. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा चित्रपट ‘दिल बेचारा’ शुक्रवारी (२४ जुलै) संध्याकाळी रिलीज करण्यात आली. सुशांतचे चाहते गेल्या अनेक दिवसांपासून आतुरतने या चित्रपटाची वाट पाहत होते. शुक्रवारी संध्याकाळी साडेसात वाजता डिस्ने हॉटस्टारवर हा सिनेमा रिलीज करण्यात आला. त्यानंतर अनेक चाहत्यांनी चित्रपट पाहून सुशांतच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच आपल्या लाडका अभिनेत्याचा शेवटचा चित्रपट पाहून चाहत्यांनी त्याच्या आठवणींना उजाळाही दिला. त्याचबरोबर सोशल मीडियावरही अनेक प्रतिक्रीया आणि भावनिक पोस्ट टाकण्यात आल्या.

सुशांतच्या मृत्यूनंतर त्याचा शेवटचा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्याची अनेक चाहत्यांची इच्छा होती. परंतु, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हा चित्रपट ओटीटीवर रिलीज करण्यात आला. पण, ऐकतील ते फॅन्स कसले, अनेक चाहत्यांनी आपल्या घरीच होम थिएटर क्रिएट करून सुशांतला मोठ्या पडद्यावर पाहण्याची आपली इच्छा पूर्ण केली. सोशल मीडियावर सुशांतला श्रद्धांजली वाहणाऱ्या अनेक पोस्ट पाहायला मिळाल्या. हसता-खेळता सुशांत चाहत्यांना पुन्हा पाहायला मिळाला. पडद्यावरील कथानक पाहून अनेकांना सुशांतच्या रियल लाइफ स्टोरीची आठवण झाली.

सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा चित्रपट ‘दिल बेचारा’ रिलीज झाला असून या चित्रपटाच मुख्य भूमिकेत अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि अभिनेत्री संजना सांघी आहे. दोघांच्या केमेस्ट्रीची लोक खूप प्रशंसा करत आहेत. चित्रपटाची पटकथा एका कॅन्सर पीडित मुलीशी संबंधित आहे. जेव्हा ती कॉलेजमध्ये असते, तेव्हा तिला कॅन्सर होतो. अशातच तिला एक मुलगा भेटतो. त्यानंतर दोघेही आपल्या आयुष्यातील दुःखाचा सामना करताना आनंद शोधण्याचा प्रयत्न करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *