४०० वर्ष जुन्या वटवृक्षाला वाचविण्यासाठी नितिन गडकरींनी बदलला महामार्गाचा नकाशा.

केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी आपल्या कामामुळे आणि त्यांच्या निर्णयामुळे देशातील असंख्य लोकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या अशाच स्वभावाची प्रचिती एका महामार्गाच्या कामात आली आहे. रत्नागिरी – कोल्हापूर – मिरज – सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचा सर्व्हिस रोड एका मोठ्या ४०० वर्ष जुन्या वटवृक्षाजवळून जातो. त्यामुळे हे झाड तोडण्यात येणार होते. मात्र पर्यावरणावादी कार्यकर्ते आणि तेथील गावकऱ्यांनी या निर्णयाला जोरदार विरोध केल्यानंतर आता हे झाड न तोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील याबाबत नितीन गडकरींना पत्र लिहिले होते. त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या महामार्गाच्या नकाशामध्ये बदल करत प्रोजेक्ट पुर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. आदित्य ठाकरे म्हणाले होते की, राज्याच्या पर्यावरण संवर्धनासाठी राज्य शासन व्यापक कार्य करीत आहे. वृक्षसंवर्धनही त्याअनुषंगाने फार महत्त्वाचे आहे. सांगली जिल्ह्यातील संबंधित वटवृक्ष पुरातन असून त्याचे जतन होणे गरजेचे आहे. सदर विनंती आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहून विनंती केली होती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *