कोरोनाने गाठले मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना कोरोनाची लागण

mp chief minister shivraj sing chauhan corona test positive

देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून कोरोनाने आता लोकप्रतिनिधींना देखील कोरोनाची लागण होत आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. आपला रिपोर्ट पॉजिटिव्ह आल्याची माहिती स्वतः ट्विट करत दिली आहे. काही दिवसांपुर्वीच त्यांच्यासोबत प्रवास केलेले कॅबिनेट मंत्री अरविंद भदौरिया यांचा रिपोर्ट देखील पॉजिटिव्ह आला होता.

त्यांनी ट्विटमध्ये लिहिलंय ‘प्रिय देशवासियांनो, मला कोविड १९ ची काही लक्षणं जाणवत होती. त्यामुळे करण्यात आलेल्या टेस्टनंतर माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली. माझी सगळ्या सहकाऱ्यांना विनंती आहे की माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली करोना चाचणी करून घ्यावी आणि माझ्या निकटचा संपर्क असणाऱ्या लोकांनी स्वत:ला क्वारंटीन करावं’.

मी करोना गाईडलाईन्सचं संपूर्ण पालन करतोय. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी स्वत:ला क्वारंटीन करून उपचार घेणार आहे. माझी राज्यातील जनतेला विनंती आहे की सावधानता बाळगा, छोटीशी चूकही करोनाला आमंत्रण देऊ शकते’ असंही शिवराज सिंह यांनी म्हटलंय.

काही दिवसांपुर्वीच मध्य प्रदेशमधील भाजप नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांना व त्यांच्या आईंना देखील कोरोनाची लागण झाली होती. मात्र उपचारानंतर त्यांनी यावर मात केली होती. देशातील स्थिती लक्षात घेता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, शनिवारी देशातील करोना संक्रमितांची संख्या वाढून १३ लाख ३६ हजार ८६१ वर पोहचलीय. यातील एकूण ४ लाख ५६ हजार ०७१ जणांवर उपचार सुरू आहेत. देशात ८ लाख ४९ हजार ४३२ जणांवर उपचार यशस्वी ठरलेत. मृतांची संख्या वाढून ३१ हजार ३५८ वर पहोचलीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *