आरोग्य विभागात लवकरच मुलाखातीशिवाय भरणार १७ हजार जागा

राज्यात लवकरच आरोग्य विभागात मोठी भरती होणार असून ही भरती मुलाखातीशिवाय होणार असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शरद पवार औरंगाबादेत पोहोचले. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी आणि अधिकाऱ्यांसोबत बैठक केली. यावेळी पालकमंत्री सुभाष देसाई आणि राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी सदर माहिती दिली.

आरोग्य विभागात आता मुलाखतीशिवाय कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे. मेरिटवर थेट भरती करण्याला परवानगी मिळाली आहे आणि राज्यात १७ हजार जागा लवकर भरल्या जाणार आहेत”, अशी माहिती यावेळी राजेश टोपे यांनी दिली.

मृत्युदर कमी करण्याचा आमचा प्रयत्न.: राजेश टोपे

राज्यात कोरोना परिस्थिती सकारात्मक आहे. धारावी, मालेगाव झिरोवर आले आहेत. राज्यात प्रत्येक जिल्ह्यातील स्थिती सुधारत आहे. संख्या वाढण्याची भीती नाही. आमचा प्रयत्न हा मृत्यूदर कमी करणे आहे आणि त्यात यश मिळत आहे”, असं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.

“आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालयं आणि डॉक्टर ताब्यात घेण्याचा अधिकार आहे. मात्र, राज्यातील डॉक्टर्सनी ती परिस्थिती निर्माण होऊ देऊ नये, हात जोडून विनंती आहे डॉक्टर्सनी सेवा द्यावी”, असे आवाहन आरोग्य मंत्र्यांनी राज्यातील डॉक्टरांना केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *