गडचांदुरकरांनो सावधान…! शहरात वाढतोय कोरोनाचा विळखा.

Corona updates in India

संपूर्ण देशात कोरोना या महामारीने धुमाकूळ माजवला असून आता याचा विळाखा गडचांदूर शहराला पडला आहे.जून महिन्यात पहिला रुग्ण आढल्यानंतर रुग्णसंख्या ही आटोक्यात होती.पण गेल्या काही दिवसांपासून कोरोनापासून दूर असलेल्या या शहरामध्ये अवघ्या तीन दिवसात ११ रुग्णाची भर पडली आहे. २३ जुलै रोजी शहरामध्ये ६ रुग्ण तर आज २५ जुलै ला पुन्हा ५ रुग्णाची भर पडली असून हे सर्व रुग्ण गडचांदूर शहरातील अतिदाट वस्ती असलेल्या एरिकेशन कॉलनी जवळील भागात आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे.हा भाग पूर्वीच प्रशासनाने सील केला असला तरी पुन्हा काही नागरिक बाधित आढळल्याने प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचे. व काही लक्षण आढळल्यास प्रशासनास संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.

शहरातील वाढते रुग्ण पाहता गडचांदुरा तील नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. काम असेल तरच घराबाहेर पडावे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. तसेच मास्कचा वापर करावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी व सतर्क राहावे, अशी विनंती चांदा टू बांदा टीम कडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *