केंद्राकडून मदत आणि पैसा येत आहे.: उद्धव ठाकरे

State government guide line for unlocked 3

मुख्यमंत्री पदावरून भाजपा आणि शिवसेना यांच्यातील संबंध ताणले गेले असले आणि दोन्ही पक्षांचे नेते एक दुसऱ्यांवर बाण सोडत असले तरी खुद्द मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मात्र कधीही थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष केले नाही. त्यांनी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत असलेले भावाभावाचे नाते जपण्याचा नेहमीच प्रयत्न केला.

याचाच प्रत्यय आज सामना मधील उध्दव ठाकरे यांच्या अनलॉक्ड या मुलाखतीतून आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याला मदत करत असल्याचं मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.

केंद्र आणि राज्य यांना एकत्र काम करावेच लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हिडिओ काँन्फरसिंग द्वारे बैठका घेत असतात. बैठकीत कोरोनाबाबत आपण ज्या गोष्टी मांडतो, त्यावर मदत देखील करत असतात. असं देखील यावेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितलं. केंद्राने राज्याला ३८ हजार कोटींची मदत द्यायचं मान्य केलं होत. परंतु ती मदत हळू हळू येत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *