संसदेच्या स्टँडिंग कमिटीवर नवनियुक्त राज्यसभा खासदारांची नियुक्ती.

संसदेच्या स्टँडिंग कमिटीवर राज्यसभेच्या नवनियुक्त खासदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात उदयनराजे यांच्याकडे रेल्वे समितीवर सदस्य म्हणून करण्यात आली आहे. शरद पवार यांना संरक्षण खात्याशी संबधित समितीवर सदस्य तर रंजन गोगोयी यांना परराष्ट्र कमिटीवर नियुक्त करण्यात आले आहे.

खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांना मनुष्यबळ विकास संसदीय समितीवर चेअरमन म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. कोरोंनाच्या संकट काळात शिक्षणाची समस्या निर्माण झाली आहे. तर चीन आणि पाकिस्तान सोबत संघर्ष होत असल्यामुळे संरक्षण समितीकडे देशाचे लक्ष असणार आहे. अशा या दोन्ही समित्यांवर मराठी खासदारांची नियुक्ती करण्यात आली आहे.


खासदारांना मिळालेल्या समित्या

• विनय सहस्त्रबुद्धे :- एचआरडी,चेअरमन
• शरद पवार :- डिफेंस कमिटी
• उदयनरजे :- रेल्वे कमिटी
• प्रियंका चतुर्वेदी :- कॉमर्स कमिटी
• डॉ. भगवान कराड :- पेट्रोलियम कमिटी
• ज्योतीरादित्य सिंधिया :- एचआरडी कमिटी
• रंजन गोगोयी :- परराष्ट्र विषयक कमिटी
• राजीव सातव :- डिफेंस कमिटी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *