सह्याद्री विद्यार्थी अकादमी,महाराष्ट्रच्या विदर्भ प्रांत अध्यक्षपदी श्री.निलेश बेलखेडे यांची निवड

जिल्ह्यात गोर गरीब मुलांच्या शिक्षणासाठी धडपड करणारे, युवकांचे मार्गदर्शक,उत्क्रुष्ठ वक्ते, चंद्रपुर जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रात, राजकारणात राहुन आपल्या सामाजिक कार्यात ओळखल्या जाणारे प्रा.निलेशभाऊ बेलखेडे ह्यांची सह्याद्री विद्यार्थी अकादमी च्या विदर्भ प्रांतअध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.विदर्भ प्रांतअध्यक्ष पद चंद्रपुर जिल्हाला मिळालेल हे गौरवच असुन याबद्दल विविध, राजकिय, सामाजिक, आणि शैक्षणिक स्तरातून त्यांच अभिनंदन केले जात आहे.

सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र पुरस्कृत सह्याद्री विद्यार्थी अकादमी संस्थेची स्थापना १२ जानेवारी २०१७ रोजी झाली असून छात्र देशस्य भूषणम् ह्या ब्रीद अंतर्गत विविध शालेय विद्यार्थी उपयोगी उपक्रम सह्याद्री विद्यार्थी अकादमी अंतर्गत राबवण्याचे काम संस्थे अंतर्गत सुरू आहे. शालेय साहित्य वाटप, वृक्षारोपण, वृक्ष बँक, बाप्पा माझा विद्येचा राजा, एक पाऊल शिक्षणाकडे , रद्दी महोत्सव असे विविध उपक्रम संस्थे मार्फत आता पर्यत मुंबई , पुणे, नाशिक, रायगड, अहमदनगर, रत्नागिरी,छ. संभाजीनगर, चाळीसगाव विविध अंगी राबवण्यात यशस्वी ठरले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *