सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग उभारणी विषयक ५ आॅगस्ट ऑनलाईन कार्यशाळा.

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, चंद्रपूरद्वारे १० वी पास व १८ वर्षे पूर्ण असलेल्या युवक-युवतींकरिता ५ ऑगस्ट रोजी एक दिवस कालावधीचे ऑनलाईन  सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग उभारणी संदर्भात ऑनलाईन कार्यशाळा अर्थात वेबिनार आयोजित करण्यात येणार आहे. या वेबिनारचा जिल्ह्यातील युवक-युवतींनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी के.व्ही राठोड यांनी केले आहे.

या कार्यशाळेत व्यवसाय उद्योजकांशी चर्चा लघुउद्योग, व्यवसाय शास्त्रीय व्याख्या व नोंदणी पद्धती, आयात निर्यात उद्योग संधी, बाजारपेठ पाहणी, प्रकल्प अहवाल तयार करणे, डिजिटल मार्केटिंग, लघु उद्योगांसाठी व व्यवसायासाठी शासनाच्या विविध योजनांची माहिती व अनुदान, सिडबी तर्फे योजना व अनुदान, लघुउद्योग प्रॉडक्ट मार्केटिंग इत्यादी विषयांवर विशेष तज्ञ व शासकीय अधिकारी वर्गाद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

प्रशिक्षणात ऑनलाईन प्रवेश घेण्याकरिता इच्छुक युवक-युवतींनी 4 ऑगस्ट 2020 पर्यंत प्रकल्प अधिकारी के. व्ही.राठोड (मो.क्र.9403078773, 07172-274416), कार्यक्रम आयोजक लक्ष्मी खोब्रागडे (मो.क्र.9309574045) महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, चंद्रपूर यांच्याशी संपर्क साधून सदर प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *