वीज कंपन्यांवर केलेल्या अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या रद्द, नितीन राऊत यांना धक्का.

राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केलेल्या वीज कंपन्यांवरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या असून हा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना मोठा धक्का मानला जात आहे. नितीन राऊत यांनी परस्पर या बदल्या केल्याने शिवसेना आणि राष्ट्रवादीसह काँग्रेसचे नेतेही नाराज होते. त्यामुळे या नेत्यांनी थेट पक्षश्रेष्ठींकडे नितीन राऊत यांच्याबद्दलची नाराजी बोलून दाखवली होती. यानंतर काही वेळातच वीज कंपन्यांवरील अशासकीय सदस्यांच्या सर्व नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहे.

नितीन राऊत यांनी वीज कंपन्यांवर केलेल्या सदस्यांच्या नियुक्तीला ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव आसीम गुप्ता यांनी  मंजुरी दिली नव्हती. परंतु, मध्यंतही कोरोना झाल्यामुळे आसीम गुप्ता काही दिवस सुट्टीवर होते. त्यावेळी हंगामी पदभार सांभाळणाऱ्या  दिनेश वाघमारे यांच्याकडून राऊत यांनी १६ सदस्यांच्या नियुक्तीला मंजुरी मिळवून घेतली होती. नितीन राऊत यांनी  सर्वांना अंधारात ठेवून वीज कंपन्यांवर परस्पर अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या केल्या होत्या. यामध्ये महापारेषण, महावितरण आणि होल्डींग कंपन्यांवरील १६ सदस्यांचा समावेश होता. यावेळी त्यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांचाही सल्ला घेतला नव्हता त्यामुळे हे नेते देखील नाराज असल्याचे समजते. यापैकी बहुतांश सदस्य नागपूरचे होते.

त्यामुळे आता महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल आहे असे सर्व नेते मंडळी सांगत असले तरी देखील वारंवार होणाऱ्या कुरबुरीमुळे महविकास आघाडीत वारंवार बिघाडी होत आहे हे दिसून येत आहे.

हेही वाचा – आमचा मन राखला जात नाही, कॉँग्रेसच्या आमदारांनी केली एकनाठा शिंदेची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *