भारतीय लष्कराचे ध्रुवास्त्र उडविणार शत्रूंचा धुव्वा.

सरकारच्या मेक इन इंडिया अंतर्गत देशाच्या सैन्याला अधिक मजबूत केले जात आहे असून सैन्याने अँटी टँक ध्रुवास्त्र क्षेपणास्त्राचे यशस्वी परीक्षण केले आहे. हे क्षेपणास्त्र मेड इन इंडिया आहे. शत्रूला पुर्णपणे उद्धवस्त करण्याची यात क्षमता आहे. ओडिशाच्या बालासोरमध्ये १५-१६ जुलैला याची चाचणी पार पडली. यानंतर या क्षेपणास्त्राला सैन्याला सोपविण्यात आले आहे.

हे क्षेपणास्त्र स्वदेशी असून, याची क्षमता ४ किमीपर्यंत आहे. कोणत्याही टँकला उद्धवस्त करण्याची यात क्षमता आहे. ध्रुव हेलिकॉप्टर देखील पुर्णपणे स्वदेशी बनावटीचे आहे. ही डीआरडीओ आणि सैन्याची मोठी कामगिरी समजली जात आहे. कारण आता दुसऱ्या देशांवर अशा क्षेपणास्त्रांसाठी निर्भरता राहणार नाही.

या क्षेपणास्त्राचा उपयोग ध्रुव हेलिकॉप्टरसह केला जाईल. आता करण्यात आलेली चाचणी मात्र हेलिकॉप्टरशिवाय करण्यात आलेली आहे. या क्षेपणास्त्राचे नाव आधी नाग होते, जे आता बदलून ध्रुवास्त्र करण्यात आले आहे. ध्रुवास्त्र हे तिसऱ्या पिढीतील अँटी टँक क्षेपणास्त्र आहे. ही प्रणाली कोणत्याही हवामानात दिवस-रात्र कधीही युद्धक टँकला नष्ट करू शकते. मेक इन इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी डीआरडीओ स्वदेशी क्षेपणास्त्रांची निर्मिती करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *