आमचा मन राखला जात नाही, कॉँग्रेसच्या आमदारांनी केली एकनाठा शिंदेची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार.

गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत प्रचंड कुरबुर्‍या होत असून या कुरबुर्‍या काही थांबण्याचे नाव घेत नाही आहे. अशातच कॉंग्रेसच्या आमदारांनी आमचा मन राखला जात नाही. तसेच कॉंग्रेस आमदारांचे कामे होत नाही असा आरोप केला आहे.

चंद्रपुर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार सुभाष धोटे यांनी मुख्यमंत्र्यांकडे ही तक्रार केली असून राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस आमदारांची कामं होत नाहीत. तसंच मान राखला जात नसल्याची तक्रार आमदार सुभाष धोटे यांनी केली.

दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचे आमदार यांच्यात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा झाली होती. या दरम्यान आमदार महोदयांनी ही तक्रार केली आहे. काँग्रेस आमदारांची कामं होणार नसतील तर लोकांना काय तोंड देणार असाही प्रश्न आमदार सुभाष धोटे यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला. आमदार धोटे यांची मंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात तीव्र नाराजी दिसली.

एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्याकडून काम रोखल्याचा आरोप सुभाष धोटे यांनी केला. जर आमदारांचा मान राखला जात नसेल, काँग्रेस आमदारांची कामं होणार नसतील, तर लोकांमध्ये कसं जाणार असा सवाल धोटे यांनी विचारला. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्र्यांनी निर्देश द्यावे अशी विनंती यावेळी आमदार सुभाष धोटे यांनी केली. त्यामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडीत बिघाडी येते की काय ? असा प्रश्न देखील निर्माण होत आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईतील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, पारनेर नगरसेवकांची फोडाफोडी, निर्णय प्रक्रियेत समाविष्ट न केल्याचा आरोप, महाजॉब्स पोर्टल जाहिरात, अजोय मेहता यांची मुख्यमंत्र्यांच्या विशेष सल्लागारपदी नियुक्ती अशा विविध बाबींवरुन महाविकास आघाडीत कुरबुर झाल्याचे पाहाला मिळाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *