नागपुरात नियम तोडणार्‍यांसाठी ‘फैसला ऑन द स्पॉट’.


वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे प्रशासन चिंतेत आहे. नियम मोडणाऱ्यांमुळे कोरोनाचा वेगानं प्रसार होतोय. नागपुरात कोरोना रुग्णसंख्या 3 हजारांच्या पार गेली आहे. त्यामुळेच नागपुरात महापौर संदीप जोशी आणि मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यात टोकाचा संघर्ष आहे. तरीही कोरोनाच्या या संकटात लोकांच्या हितासाठी, नियम तोडणाऱ्यांविरोधात, महापौर आणि आयुक्त दोघेही रस्त्यावर उतरले आहेत.

मनपा आयुक्त तुकाराम मुंडे व महापौर संदीप जोशी दोघेही अॅक्शन मोड मध्ये असून सम–विषम नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर ऑन द स्पॉट कारवाई केली. कोरोना रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर महापौर संदीप जोशी यांनी गोपालनगर, प्रतापनगर परिसरात पायदळ फिरत दौरा केला. या दौऱ्यादरम्यान सम-विषम नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर तात्काळ कारावाईचे निर्देश महापौरांनी दिले, तर इकडे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनीही झाशी राणी चौक ते आनंद टॉकीज, बर्डी, कॉटनमार्केट, चिटणीसपार्क परिसरात आकस्मिक दौरा केला आणि सम – विषम नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर ऑन द स्पॉट कारवाई केली.

शहराचे प्रथम नागरिक आणि आयुक्त रस्त्यावर उतरल्याने नागपुरातील नियमांच उल्लंघन करणार्‍यांनी चांगलाच धसका घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *