‘ या ‘ राज्यात मिळणार रेशन घरपोच, महाराष्ट्रात कधी?

कोरोनाचा संसर्ग गर्दीच्या ठिकानातून होत असल्याने घरपोच रेशन देण्याचा क्रांतिकारी निर्णय दिल्ली सरकारने घेतला आहे. घराघरामध्ये रेशन योजनेस मंजुरी देण्याचा मोठा निर्णय दिल्लीच्या केजरीवाल सरकारने घेतलाय. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेत याबद्दल माहिती दिली. ही योजना झाल्यानंतर लोकांना रेशन दुकानांवर जावे लागणार नाही. गरीबांना घरपर्यंत रेशन पोहोचवण्याचा निर्णय झालाय. दिल्लीत दरमहा साधारण ७२ लाख जणांना रेशनची सुविधा मिळते. यासर्व लाभधारकांना आता घरपोच रेशन मिळणार आहे.

ही योजना सुरु झाल्यानंतर लोकांना रेशन पाठवलं जाणार असून त्यांना रेशन दुकानावर येण्याची गरज नसेल. हे एक क्रांतिकारक पाऊल आहे. गरिबांना सन्मानाने रेशन मिळावं अशी माझी अनेक वर्षांपासून इच्छा होती, जी आज पुर्ण झाल्याचे मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले. ज्या दिवशी दिल्लीत मुख्यमंत्री घर-घर रेशन योजना सुरु होईल त्याच दिवशी दिल्लीत केंद्र सरकारची वन नेशन वन रेशन कार्ड योजना लागू केली जाईल असेही ते म्हणाले. 

डिलीव्हरी अंतर्गत गहूच्या ऐवजी पीठ दिले जाईल. ६ ते ७ महिन्यात ही योजना सुरु होण्याची शक्यता आहे.  याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रात देखील असाच निर्णय घेईल काय? असा प्रश्न नागरिकांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *