शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर मुनगंटीवार यांच्या कडून टीका.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरुन केंद्रातील भाजपा सरकारवर टीका केली होती. मंदिर बांधून कोरोना जाणार आहे का ? असा टोला शरद पवार यांनी यावेळी लगावला होता. राज्य सरकार कोरोना रुग्णांना रोखण्यासाठी प्रयत्न करत असून कोरोनाला रोखणे याला राज्य सरकार प्राधान्य देत आहे. परंतु काही लोकांना मंदिर बांधल्याने कोरोना जाईल असे वाटत असेल तर कोरोना जाणार आहे का असे वक्तव्य शरद पवारांनी सोलापुरत असतांना केले होते.

त्यांच्या या वक्तव्यावर आता राज्यातील भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी टीका केली आहे. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की “ राम मंदिर हा श्रद्धेचा विषय आहे. यावर राजकारण करणे योग्य नाही. राज्यातील मंत्र्यांना गाडी घेण्यामुळे कोरोना जाणार आहे काय ? शेतकर्‍यांना कर्जमाफी न देण्यामुळे कोरोना जाणार आहे काय ? २० रूपयांचा मास्क महाराष्ट्रात २०० रुपयाला विकल्याने कोरोना जाणार आहे काय ? असा संतप्त सवालही यावेळी भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी केला. राम मंदिर हा श्रद्धेचा विषय असून यावर वक्तव्य करून कोणीही राजकारण करण्याचा प्रयत्न करू नये. असे देखील ते यावेळी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *