जिल्ह्यातील युवावर्गाने २३ जुलै रोजी घ्यावा ऑनलाईन रोजगार मेळाव्याचा लाभ.

जिल्ह्यातील युवक व युवतींना रोजगार प्राप्त व्हावा यासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र चंद्रपूर कार्यालयाच्या वतीने दिनांक २३ जुलै २०२० रोजी ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक-युवतींनी नाव नोंदणी करून ऑनलाइन रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांनी केले आहे. यासाठी उमेदवारांकरीता संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करण्याच्या कार्यपद्धतीचा अवलंब करावा असे देखील त्यांनी यावेळी आवाहन केले आहे.

कसा करावी ऑनलाईन नोंदणी

www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन किंवा प्ले स्टोअर मधुन महास्वयम अप्लीकेशन मोफत डाऊनलोड करुन इन्स्टॉल करा व एम्प्लॉयमेंट वर क्लिक करून एम्प्लॉयमेंट पृष्ठावरील जॉब सिकर हा पर्याय निवडून नोंदणी, आधार कार्ड क्रमांक व पासवर्डने साइन इन करा. नंतर होम पेजवरील पंडित दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर हा पर्याय निवडा. चंद्रपूर जिल्हा निवडा व फिल्टर बटनावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर वन या ओळीतील अॅक्शन मेनुतील दुसऱ्या बटनावर (व्हॅकन्सी लिस्टिंग) क्लिक करा.आय अॅग्री हा पर्याय निवडा. पर्याय निवडल्यानंतर शैक्षणिक पात्रतेनुसार जुळणारे विविध कंपन्यांच्या रिक्त पदांना अप्लाय बटनावर क्लिक करा.

२३ जुलै रोजी मेळाव्याच्या दिवशी उद्योजकांसोबत व्हाट्सअप, गुगल मिट, व्हिडीओ कॉलींग इत्यादींच्या माध्यमातून मेळाव्याचे दिवशी संपर्क साधून ऑनलाईन मुलाखत द्यावी लागणार असून यासाठी पूर्व तयारी करून ऑनलाईन रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा. ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी काही अडचणी आल्यास कार्यालयीन वेळेत ०७१७२-२५२२९५ दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

One Comment on “जिल्ह्यातील युवावर्गाने २३ जुलै रोजी घ्यावा ऑनलाईन रोजगार मेळाव्याचा लाभ.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *