ट्विटरवर पंतप्रधान मोदींचे तब्बल ६ कोटींपेक्षा जास्त फॉलोअर्स.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेत दिवसे न दिवस मोठ्या प्रमाणत वाढ होत असून पंतप्रधान मोदींचे तब्बल ६ कोटींपेक्षा जास्त फॉलोअर्स झाले आहे. २००९ मध्ये मायक्रो ब्लागिंग साइट ट्विटरवर नरेंद्र मोदी यांनी अकाउंट उघडले होते. ट्विटरवर सर्वाधिक फॉलो केल्या जाणाऱ्या नेत्यांच्या यादीत त्यांचा समावेश होतो. त्यातच आता तब्बल ६० मिलिअनच्या पुढे त्यांच्या ट्विटर अकाउंटवरील फॉलोअर्सची संख्या गेली आहे. याचा अर्थ भारतासह संपूर्ण जगात ६ कोटींहून अधिक लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विटरवर फॉलो करतात.

गेल्या १० महिन्याच्या कालावधीत नरेंद्र मोदी यांना तब्बल १ कोटी लोकांनी फॉलो केले आहे. भारतासह जगातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मोठे चाहते असून त्यांच्या विषयी माहिती मिळविण्यासाठी ते नरेंद्र मोदी यांना ट्विटर वर फॉलो करत असतात.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा ट्विटरवर सर्वाधिक लोकप्रिय नेत्यांमध्ये पहिला क्रमांक लागतो. ओबामा यांना तब्बल १२ कोटी लोक ट्विटरवर फॉलो करतात. यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दुसरा क्रमांक आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना ट्विटरवर ८ कोटी ३७ लाख लोक फॉलो करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *