पहाटे ३ वाजता तरुण रस्त्यावर थिरकले, पोलिसांनी झोडपले.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यााठी अनेक ठिकाणी सक्तीचे लॉक डाऊन घेण्यात आले आहे. कोल्हापुरात देखील लॉक डाऊन घोषित करण्यात आहे असून सर्वांना घरीच राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, असं असतानाही रंकाळा येथे काही तरुणांनी पहाटेच्यावेळी भर रस्त्यावर नाचगाणी सुरू केली. त्यामुळे पोलिसांनी या तरुणांना चांगलाच चोप दिला असून त्यांच्या मानगुटीवरचं नाचगाण्याचं भूत उतरवलं आहे.

कोल्हापुरात सात दिवस हा लॉकडाऊन राहणार असून या काळात कोणीही कारणाशिवाय घराबाहेर पडू नये, असं आवाहन प्रशासनाने केलं आहे. मात्र, रंकाळा तलावाजवळच्या गणपती चौकात तीन तरुणांनी पाहटे तीन वाजता कार आणि बाईक थांबवून कर्णकर्कश आवाजात गाणी लावून भररस्त्यावर मनसोक्त नाचायला सुरुवात केली. अभिनेते स्वप्नील राजशेखर यांच्या घराच्या खालीच हा प्रकार घडला. राजशेखर यांनी याबाबतचा व्हिडिओही शूट केला आहे.

सदर तरुणांने पहाटे तीन वाजता रस्त्यावर गाणे लाऊन मस्त नाचायला सुरवात केली. मात्र त्याच वेळी गस्तीवर असणारी पोलिसांची जीप घटनास्थळी दाखल झाली. त्यामुळे या तिघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. दोघेजण कारमध्ये बसले तर एकजण बाईकवरून पळून गेला. मात्र कारमधील दोघे पोलिसांच्या तावडीत सापडले. त्यातील एकाला पोलिसांनी बाहेर काढून त्याच्याकडे विचारपूस केली आणि त्याला हातातील दांडुक्याने बदडण्यास सुरुवात केली. त्यामुळे रस्त्यावर नाचण्याची त्या तरुणांना चांगलेच महाग पडले. नाचण्याचा छंदामुळे पाठीवर दंडुके बसले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *