दिलासादायक. ! सर्वाधिक कोरोना चाचणी करणाऱ्या यादीत भारत दुसरा.

First Corona patient death in chandrapur

कोरोनाचा देशातील आकडा झपाट्याने वाढत असला तरी दिलासादायक बाब म्हणजे भारतात मोठ्या प्रमाणत कोरोनाच्या चाचण्या होत आहे. आता पर्यंत अमेरिकेत ४.२ कोटी नमुन्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. तर सर्वाधिक नमुन्याची चाचणी करण्याच्या यादीत अमेरिकेनंतर भारताचा नंबर लागतो. व्हाईट हाऊसने यासंबंधी माहिती दिली आहे. भारतात आतापर्यंत १.२ कोटी नमुन्यांची कोरोना  चाचणी करण्यात आली आहे.

 गेल्या २४ तासांत देशात ३८,९०२ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्र सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण आढळून आले. दिल्लीमध्ये गेल्या २४ तासांत कोरोनाचे १२११ नवीन रुग्ण आढळून आलेत. वाढत्या संख्येमुळे देशातील करोना रुग्णांची संख्या ११ लाखांवर गेली आहे.

महाराष्ट्र सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण आढळून आले. गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात कोरोनाचे ९५१८ नवीन रुग्ण आढळून आलेत. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे. त्याच वेळी, गेल्या २४ तासांत कोरोनाने २५८ जणांचा मृत्यू झाला आहे. या जीवघेण्याने विषाणूने आतापर्यंत महाराष्ट्रात एकूण ११,८५४ लोकांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *