राम मंदिराच्या भूमिपूजनाची तारीख ठरली, पंतप्रधानांच्या हस्ते होणार भूमिपूजन

गेल्या अनेक वर्षांपासून वादळ निर्माण करणाऱ्या राम मंदिराच्या निर्मितीबाबत ताबडतोब काम होत असताना दिसून येत आहे. अयोध्येतल्या राम मंदिराच्या निर्मितीचं काम तीन किंवा पाच ऑगस्टला सुरू होऊ शकते. आज अयोध्येमध्ये मंदिर निर्माण ट्रस्टची एक महत्वाची बैठक झाली, त्यानंतर या दोन तारखांचा प्रस्ताव भूमिपूजनासाठी पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवला गेला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन व्हावं, अशी इच्छा राम जन्मभूमी न्यासनेही व्यक्त केली होती.

राममंदिराच्या उभारनिशी प्राथमिक कामे पार पडल्यानंतर देशभरातील १० कोटी लोकांकडून देणगी गोळा करून राम मंदिराचे काम सुरू करण्यात रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची बैठक होण्याअगोदर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह डॉ. कृष्ण गोपाल यांनी अयोध्येत जाऊन मंदिर उभारणीच्या कार्यात सहभागी असलेल्या साधू व विश्व हिंदू परिषदेचे नेते यांच्याशी चर्चा केली.

राम मंदिर निर्मितीचा प्लॅन

येत्या ३ महिन्यांमध्ये ट्रस्ट निर्माण करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. या राम मंदिर ट्रस्टमध्ये सहापेक्षा अधिक सदस्य असू शकतात. मंदिरासाठी उत्तर प्रदेश सरकारचं ५०० कोटींचं बजेट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राम मंदिराच्या ८ किलोमीटरच्या परिघात धर्मशाळा, हॉटेल बांधण्यास परवानगी नसेल.

२०२० मध्ये राम मंदिराच्या बांधकामास सुरुवात होईल. तर २०२३ पर्यंत मंदिराचं बांधकाम पूर्ण करण्याचे सरकारचे लक्ष्य आहे. दरम्यान मंदिराचं बहुतांश स्ट्रक्चर हे दगडाचं असेल. त्यासाठी लागणारे दगड तासण्याचे काम सुरु आहे. आतापर्यंत ६० टक्के दगड तासण्याचे काम पूर्ण झालं आहे. दरम्यान मंदिरासोबतच अयोध्येच्या पुनर्विकासाची योजना आखण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *