देशात कोरोनाचा समूह संसर्ग सुरू ?

देशात सध्या दररोज ३४ हजारांपेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण आठळून येत आहे. आत्तापर्यंत भारतातील करोना रुग्णांची संख्या १० लाख ३८ हजार ७१६ वर पोहचलीय.वृत्तसंस्था एएनआयनं दिलेल्या माहितीनुसार, भारतात प्रत्येक दिवश ३० हजारांहून अधिक करोना रुग्ण आढळत आहेत. हे वास्तव आहे. करोना आता ग्रामीण भागांनाही विळखा घालतोय. हे वाईट संकेत आहेत. हा समूह संसर्ग असल्याचं लक्षात येतंय, असं डॉ. मोंगा यांनी म्हटलंय.

याच दरम्यान इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) नं भारतात समूह संसर्ग सुरू झाल्याचं आणि परिस्थिती बिकट होत असल्याचं म्हटलंय. आयएमए हॉस्पीटल बोर्ड ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. व्ही.के. मोंगा यांनी देशातील करोना रुग्णांच्या संख्येत तेजीनं वाढ होत चालल्याचं म्हटलंय. यामुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते, असं त्यांचं म्हणणं आहे.

डॉ. मोंगा यांचे हे व्यक्तव्य अत्यंत महत्वाचे असून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून अद्याप देशात समूह संसर्ग फैलावल्याचं मान्य करण्यात आलेलं नाही. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या या दाव्याला अनेक आरोग्य तज्ज्ञांनीही आव्हान दिलंय. यासोबतच करोना व्हायरसच्या रुग्णांच्या बाबतीत भारत तिसऱ्या क्रमांकावर पोहचलाय.

कोरोनारुग्णांची एकूण संख्या १० लाख ३८ हजार ७१६ वर पोहोचली आहे. कोरोनामुक्त रुग्णांची टक्केवारी ६२.९३ वर पोहोचली असून सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांपेक्षा करोनामुक्त रुग्णांची संख्या जास्त आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *