“डॉनला कोरोनाने पकडलंय तुम्हीं उगाच डॉन बनून फिरू नका”, नगरपालिकेची अनोखी जाहिरात.

राज्यातील कोरोणाचा संसर्ग वाढतच आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रत्येक सरकारी यंत्रणा कोरोना नियंत्रण आणि जनजागृतीवर मोठा भर देताना दिसत आहेत. जनजागृतीसाठी काही नगरपालिकांनी भन्नाट कल्पना राबवून लोकांपर्यंत संदेश दिला आहे. असंच एक उदाहरण उस्मानाबादमध्ये पाहायला मिळत आहे. कोरोना संसर्गाची पर्वा न करता घराबाहेर पडणाऱ्या अतिशाहण्यांना नगरपालिकेने एका अनोख्या पोस्टरमधून घरातच थांबण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी थेट बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते बिग बी अमिताभ बच्चन यांनाही कोरोना झाल्याचं सांगण्यात आलं आहे.

ज्या डॉनला पकडणे मुश्किलच नाही तर नामुमकिन होते अशा डॉनला कोरोणाने पकडले असून तुम्ही उगाच बाहेर डॉनसारखे फिरू नका घरीच थांबा अशी जाहिरात नगरपालिकेकडून लावण्यात आली आहे. विशेष म्हणजे पोस्टर सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यावर अनेक गमतीशीर प्रतिक्रिया येत आहे. काही लोक बाहेर पडणाऱ्या अतिशहाण्यांवर निशाणा साधत टोले लगावत आहेत. तर काही जण नगरपालिकेच्या या कल्पकतेचं कौतुक करत आहेत.

उस्मानाबादमधील लोहारा नगरपालिकेने अमिताभ बच्चन यांचा प्रसिद्ध चित्रपट ‘डॉन’चा लोकप्रिय डायलॉग वापरुन हे पोस्टर तयार केलं आहे. या पोस्टरवर लिहिलं आहे, “ज्या डॉनला पकडणे मुश्कीलच नाही तर नामुमकीन होते, त्याच डॉनला कोरोनानं पकडलंय. आपणही आपल्या परिवारासाठी घरीच थांबा. उगाच डॉन बनू नका.” या पोस्टरवर अमिताभ बच्चन यांच्या डॉन चित्रपटाचं बॅनरही लावलं आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *