खुशखबर ! राज्यात येत्या ४ महिन्यात १२,५३८ जागांची पोलीस भरती.

राज्यातील तरुणांसाठी दिलासादायक बातमी आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था भक्कम करण्यासाठी व राज्यातील पोलिस दलांवरील कामाचा ताण कमी करण्यासाठी राज्यात १० हजार पोलिस शिपायांची भारती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली होती .मात्र राज्यात १२,५३८ पोलिसांची भरती करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देखमुख यांनी दिली आहे. येत्या ४,ते ५ महिन्यात ही भरती घेण्यात येणार आहे.

गृह विभागाच्या अधिकार्यांससोबत झालेल्या बैठकीत राज्य पोलीस दलात विविध पदांवर जवळपास १२,५३८ पदांची भरती तातळीने करण्यात यावी अशी सूचना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी संबंधीत अधिकार्यांवना दिल्या आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात झालेल्या बैठकीत त्यांनी ८ हजारऐवजी १० हजार पोलिसांची भरती करण्याचे निर्देश दिले होते. कोरोंना संकटाच्या पार्श्वभूमीवर भरतीची प्रक्रिया विनाअळथळा यशस्वीपणे कशी राबवता येईल याचा देखील प्रस्ताव मांडण्याचे निर्देश देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते. त्यानंतर आता गृहमंत्र्यांनी १२,५३८ जागांची पोलिस भरती करण्याचे आदेश दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *