सोनू सूदनी दिल्या महाराष्ट्र पोलिसांना २५,००० फेस शिल्ड.

लॉकडाउनच्या काळात स्थलांतरितांसाठी महीसा म्हणून समोर आलेल्या सोनू सूद याने पुन्हा आपल्या कार्याने मन जिंकले आहे. लॉकडाउनमध्ये त्याने मुंबईसह राज्यातील अनेक मजुरांना आपल्या घरी पोहचविण्यास मदत केली होती. त्यामुळे त्याची संपूर्ण देशात प्रशंसा झाली होती. आता पुन्हा तो मदतीसाठी समोर आला असून आता त्याने महाराष्ट्र पोलिसांकरिता २५,००० फेस शिल्ड दिल्या आहे. त्यांच्या ह्या मदतीसाठी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आभार मानले.

अनिल देशमुख यांची सोनू सूदने भेट घेतली आणि पोलिस कर्मचा-यांसाठी २५,००० फेस शिल्ड दिले. मी सोनू सूद याचा या अतुलनीय योगदानाबद्दल आभारी आहे असे आशयाचे ट्विट अनिल देशमुख यांनी केले आहे. राज्याचे मंत्री जयंत पाटील यांनीही अभिनेता सोन सूद याच्या या कामगिरीचे कौतुक केले होते. तर क्रिकेटर शिखर धवन याने देखील सोनूच्या या कार्याला ट्विटच्या माध्यमातून सलाम केला होता. या व्यतिरिक्त सोनू सूदने कोरोना व्हायरसच्या संकटात विविध माध्यमातून मदतीचा हात पुढे केला आहे. पीपीई कीट पुरवण्यापासून आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी त्याने हॉटेल खुले करुन दिले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *