प्रियसीला भेटण्याकरीता उस्मानाबादवरुन निघला थेट पाकिस्तानला.

लॉकडाउनमध्ये आपल्या पत्नीचा किंवा प्रियसीचा विरह सहन न झाल्याने अनेकांनी आपल्या प्रियसीला भेटण्याकरिता अनेकांनी पायी अथवा मिळेल ते पकडून आपल्या प्रेमापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला. मात्र उस्मानाबाद येथील तरुण आपल्या प्रियसीला भेटण्याकरिता बाइकने थेट पाकिस्तानला निघाला होता. बाईकवरुन गुजरातपर्यंत पोहोचल्यानंतर, त्याला बीएसएफ जवानांनी भारत-पाक सीमेवर पकडले. झिशान सिद्दीकी असं या तरुणाचे आहे.

झिशानची सोशल मीडियावरुन पाकिस्तानी तरुणीसोबत ओळख झाली होती. दररोजच्या चॅटिंगमधून दोघांचे एकमेकांवर प्रेम जडले होते. प्रेमात वेडा झालेल्या झिशानला कोरोनाचे काय, भारत-पाकिस्तान सीमांचेही भान राहीले नाही.
प्रेमात वेडा झालेला झिशान मोटारसायकल घेऊन अहमदनगरमार्गे गुजरातच्या कच्छ भागात पोहोचला. तिथे त्याची मोटारसायकल बंद पडल्याने तो पायी चालत पाकिस्तानला निघाला होता. तिथे भारतीय सीमा ओलांडण्याच्या तयारीत असताना त्याला बीएसएफच्या जवानांनी ताब्यात घेतलं आहे.


झिशान हा पाकिस्तान साथी निघाला याची कोणतीच माहिती त्याच्या कुटुंबाला नव्हती. त्यांना आपला मुलगा हरविल्याची तक्रार देखील केली. पण जेव्हा बीएसएफ जवानांनी पोलिसांना त्याची लव्ह स्टोरी सांगितली तेव्हा पोलिसांबरोबरच त्याच्या कुटुंबाला देखील मोठा धक्का बसला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *