चंद्रपूर जिल्ह्यात सर्वत्र भाजपा तर्फे वीज बिल माफीसाठी वीज बिलांची होळी पेटवून आंदोलन.

कोरोना मुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते. त्यामुळे महावितरण कडून देखील वीज बिल पाठविण्यात आले नव्हते. परंतु आता महावितरण कडून अव्वा च्या सव्वा वीजबिल ग्राहकांना पाठविल्याने ग्राहकांचा पारा चांगलाच भडकला आहे. कित्येक ग्राहकांना त्यांना येणाऱ्या बिलांपेक्षा चौपट पाचपट बिल आले. त्यामुळे वीज ग्राहक बिल कमी करण्यासाठी गेले असता त्यांना वीज बिल वीजबिल बरोबर असून तुम्हाला भरावेच लागणार असे सांगण्यात येत होते.

कोरोनाच्या काळात सर्वसामान्यांना प्रचंड वीजबिल पाठविण्यात आली आहे. ती तीन महिन्याची बिले माफ करण्यात यावी. तसेच ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही त्यांना ताबडतोब कर्जमाफी देण्यात यावी. शेतकऱ्यांना खतांचा असलेला अपुरा पुरवठा मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्यावा यासाठी आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने एस डी ओ यांना निवेदन देण्यात आले तसेच वीज. बिले जाळून आंदोलन करण्यात आले.

अँड. संजय धोटे
भाजपा नेते राजुरा

लॉकडाऊनमुळे हाताचा रोजगार गेला आणि त्यातच महावितरण ने अव्वा च्या सव्वा वीजबिल पाठविल्याने नागरिकांत मोठ्या प्रमाणात असंतोष पसरला आहे. याच पार्श्भूमीवर भाजपा कडून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात वीजबिल जाळून वीजबिल माफ करण्यासाठी आंदोलन करण्यात आले. याचे पडसाद चंद्रपूर जिल्ह्यात देखील पडले असून चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा, गोंडपिपरी, कोरपना, नकोडा, गडचांदूर, ब्रम्हपुरी, घुग्गुस व इतर जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी महाविकास आघाडी सरकार विरुद्ध प्रचंड नारेबाजी व घोषणाबाजी करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *