दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे गुणपडताळणी अर्ज होणार ऑनलाईन

महाराष्ट्र बोर्डाचा १२ विचा निकाल नुकताच लागला आहे. याच पार्श्वभूमीवर बारावीसोबतच दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला आहे.

दरवर्षी निकाल लागल्यावर गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मुल्यांकन आणि स्थलांतर प्रमाणपत्र यासाठीचे अर्ज देण्यासाठी विद्यार्थ्यांना स्वत: मंडळात जावं लागत होतं किंवा शाळा, महाविद्यालयांच्या मार्फत मंडळात अर्ज द्यावे लागत होते. मंडळात अर्ज देणं गरजेचं होते. पण यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता शाळा, महाविद्यालयं आणि विभागीय मंडळामध्ये गर्दी होऊ नये यासाठी ही सगळी प्रक्रिया ऑनलाईन केली जाणार आहे. निकाल जाहीर झाल्याच्या दुसऱ्या दिवशीपासून ही आॅनलाईन प्रक्रिया सुरु होईल. यामुळे विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना होणारा अतिरिक्त त्रास कमी होणार आहे.

दहावीचे विद्यार्थी

htt://verification.mh-ssc.ac.in

आणि बारावीचे विद्यार्थी

http://verification.mh-hsc.ac.in

या वेबसाईटवरुन अर्ज करु शकतील. या अर्जासाठी लागणारी फी सुद्धा आॅनलाईन भरावी लागेल. १६ जुलैला बारावीचा निकाल जाहीर झाल्यावर १७ जुलैपासून बारावीचे विद्यार्थी या वेबसाईटवरुन अर्ज दाखल करु शकणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *