गुगल भारतात करणार तब्बल ७५ हजार कोटींची गुंतवणूक

गुगल भारतात मोठी गुंतवणूक करणार असून याबाबत गूगलचे सीईओ सुंदर पिचाई व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात बैठक पार पडली आहे. कोरोना विषाणूमुळे देशावर आर्थिक संकट आलं आहे, अशा परिस्थितीत गुगलने भारतात इतक्या मोठ्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे. या गुतवणुकीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजीटल भारताचं व्हिजन साकारण्यात मदत होईल, असं गुगलने सांगितलं.

सुंदर पिचाई आणि मोदींची वर्जुअल बैठक

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्यात चर्चा झाली. यावेळी वेगवेगळ्या मुद्यांवर चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याबाबतची माहिती दिली. “आम्ही शेती, तरुण आणि व्यापाऱ्यांचं जीवन बदलण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाच्या वापराबद्दल चर्चा केली”, असं पंतप्रधानांनी सांगितलं. गुगल फॉर इंडिया च्या वार्षिक कार्यक्रम आज वर्चुअली आयोजित करण्यात आला. कोरोनाविषाणूमुळे हा कार्यक्रम वर्चुअली घेण्यात येत आहे. या कार्यक्रमात गुगल आणि अल्फाबेट चे सीईओ सुंदर पिचाई उपस्थित राहणार आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *