मोठी बातमी..! राजभवनातील १६ कर्मचारी कोरोना पोझीटिव्ह

राजभवनातील १६ कर्मचाऱ्यांचा कोरोना रिपोर्ट पोझीटिव्ह आला आहे. राजभवनातील एकूण १०० कर्मचाऱ्यांचा कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यातून १६ कर्मचाऱ्यांचा रिपोर्ट पोझीटिव्ह आला आहे. त्यामुळे आता राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना विलगीकरणात  ठेवण्यात आले आहे. अजून ५७ जणांचे रिपोर्ट यायचे बाकी आहेत. राजभवनात एवढ्या मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी क्वॉरंटाइन झाले आहेत.

राजभवनात एका इलेक्ट्रिशियनला खोकला आणि ताप आला होता. त्यामुळे त्याची टेस्ट केल्यानंतर त्याला करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. त्यामुळे राजभवनातील १०० कर्मचाऱ्यांची कोविड टेस्ट करण्यात आली. त्यात १६ जणांना करोनाची लागण झाल्याचं निदान झालं आहे. तर ५७ कर्मचाऱ्यांचे रिपोर्ट अजून यायचे बाकी आहेत. एकाच वेळी १६ कर्मचाऱ्यांचे रिपोर्ट पोझीटिव्ह आल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी क्वॉरंटाइन झाले आहेत. त्यांचीही करोना टेस्ट करण्यात येणार असून राजभवनाचनं सॅनिटाइझेशन करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *