अमिताभ बच्चन आणि अभिषेकला कोरोनाची लागण

देशातील कोरोनाचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढत असून काल महानायक अमिताभ बच्चन यांची कोरोनाची पोझीटीव्ह आली आहे. आज सायंकाळी मुंबईतील नानावती रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे. याबाबत खुद्द अमिताभ बच्चन यांनीच ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे.

अमिताभ यांना करोनाची लागण झाल्याने त्यांचे लाखो चाहते काळजीत पडले आहेत. अमिताभ यांनी ट्विटरच्या माध्यमातून स्वत: आपल्या आजारपणाबाबत माहिती देत संभ्रम वाढू दिलेला नाही. अमिताभ यांना आज सायंकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर रात्री १० वाजून ५२ मिनिटांना त्यांनी ट्विट केलं व तपशील दिला. ‘माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयाने संबंधित यंत्रणांना याबाबत कळवलं आहे. घरातील अन्य सदस्य आणि स्टाफचे स्वॅबही तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. त्यांचा करोना चाचणी अहवाल अजून आलेला नाही. त्याची प्रतीक्षा आहे’, असे नमूद करतानाच अमिताभ यांनी संपर्कातील अन्य व्यक्तींनाही आवाहन केलं आहे. गेल्या दहा दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कृपया करोना चाचणी करून घ्यावी, अशी विनंती अमिताभ यांनी केली होती.

यानंतर संपूर्ण बच्चन कुटुंबियांची करोना चाचणीही करण्यात आली. हाती आलेल्या माहितीनुसार आता अभिनेता अभिषेक बच्चनही करोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे.

महानायक अमिताभ बच्चन आणि पुत्र अभिषेक बच्चन यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर बच्चन कुटुंबातील अन्य सदस्यांच्या प्रकृतीबाबतही काळजी व्यक्त होत आहे. मात्र, जया बच्चन, ऐश्वर्या व आराध्या सुदैवाने यांच्या रिपोर्ट निगेटीव  आल्याची बातमी पुढे येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *