अनूपम खेर यांच्या आईसह भावाच्या कुटुंबाला कोरोनाची लागण.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून आता कोरोना मोठमोठ्या सेलिब्रिटी पर्यंत पोहचला आहे. महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे नुकतेच निष्पन्न झाले आहे. त्यातच आता जेष्ठ अभिनेते अनुपम खेर यांच्या कुटुंबियांना देखील कोरोनाची लागण झालीय अनुपम खेर यांची आई, भाऊ, वहिनी, पुतणी यांना संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यांना कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तेथे उपचार सुरु आहेत. अनुपम खेर यांचीही चाचणी घेण्यात आली. त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

मोठी बातमी..! राजभवनातील १६ कर्मचारी कोरोना पोझीटिव्ह

अनुपम खेर यांची आई दुलारी, भाऊ राजू, वहिणी रिमा आणि पुतणी वृंदा यांच्या कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्या आहेत. स्वतः अनुपम खेर यांनीच ट्विट करत याबाबत माहिती दिली. या सर्वांची प्रकृती स्थिर असून त्यांना सौम्य लक्षणं आहेत. अनुपम खेर यांच्या आईला कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. इतर सदस्यांचं घरातच विलगीकरण करण्यात आलं आहे.

अभिनेत्री रेखा यांच्या बंगल्यातील सुरक्षा रक्षाकाला देखील कोरोना झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे रेखा यांचा बंगला सील करण्यात येणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे.

अमिताभ बच्चन आणि अभिषेकला कोरोनाची लागण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *