गडचांदुरातील शहरातील मोकाट फिरत असणाऱ्या डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे नगरपरिषदेला निवेदन

गडचांदुर येथील काही प्रभागांमध्ये मोकाट फिरणाऱ्या डुकरांचा व जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे नगरपरिषदेला निवेदन देण्यात आले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष ऋषिकेश भारती यांनी निवेदन देऊन याचा बंदोबस्त करण्यासाठी मागणी केली आहे

मागील काही दिवसांपासून शहरातील काही नागरिकांनी देखील याचा पाठपुरावा केला मात्र यावर कोणतीही उपाययोजना नगरपरिषद कडून करण्यात आलेली नाही. नागरिक वास्तव्य करत असणाऱ्या वस्तीत डुकरांचे वास्तव्य असणे म्हणजे रोगांना आमंत्रण देण्यासारखे आहे त्यामुळे याकडे प्रामुख्याने लक्ष देऊन येत्या ८ दिवसांत ही समस्या सोडवावी अन्यथा शहरात फिरत असणारे मोकाट जनावरे व डुकरे नगर परिषदेच्या आवारात सोडण्यात येईल असा इशारा देखील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे यावेळी देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *