कुख्यात गुंड विकास दुबेचा एन्काऊंटर

कुख्यात गुंड विकास दुबे यांचा एन्काऊंटर करण्यात आला आहे. कालच विकास दुबे याला उज्जैन येथून पकडण्यात पोलिसांना यश आलं होत. विकास दुबे कुख्यात गुंड असून त्याच्यावर हत्या, खंडणी असे अनेक गुन्हे दाखल होते.

मिळालेल्या माहितीनुसार विकास दुबे याला पोलीस नेत असताना पोलिसांच्या गाडीचा अपघात झाला. त्यादरम्यान विकास दुबे यांनी बंदूक घेऊन पडण्याचा प्रयत्न केला. त्या दरम्यान झालेल्या घडामोडीत विकास दुबे यांचा एन्काऊंटर करण्यात आला. पोलिसांनी विकास दुबे याला आत्मसमर्पण करण्याची संधी दिली मात्र त्याने पडण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्याच्यावर फायर करण्यात आल्याचे समजते.

या दरम्यान झालेल्या चकमकीत ATF चे दोन जवान जखमी झाले. विकास दुबे यांच्यावर ६० गुन्हे दाखल होते. विकास दुबे याने ८ पोलिसांना मारले होते. त्यामुळे  त्याच्यावर ५ लाखांचे बक्षीस सुद्धा ठेवण्यात आले होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *