चंद्रपुरात आज १४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद

चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोनाबधितांची संख्या वाढत असून आज जिल्ह्यात नवीन १४ रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यामध्ये गुरुवार दिनांक ९ जुलै रोजी आरोग्य विभागाकडून आलेल्या प्राथमिक माहितीनुसार एकाच दिवशी १४ बाधित पुढे आले आहेत. आज त्यामध्ये १४ बाधिताची भर पडल्याने एकूण संख्या १४८ झाली आहे. आतापर्यंत ८० नागरिक कोरोना मुक्त झाले असून सध्या ६८ नागरिक जिल्हयात उपचार घेत आहेत. १४८ संख्येमध्ये चंद्रपूर शहरात निदान झालेले अन्य जिल्हयातील ४ बाधित आहेत. हे चारही बाधित राज्य राखीव पोलीस दलाचे जवान आहेत.

आज नव्याने वाढलेल्या रुग्णांमध्ये जानाळा ( एकूण २), गडचांदूर ( एकूण ३ ) भद्रावती ( एकूण ५ ) बेंबाळ ( एक ) ब्रम्हपुरी तालुका ( एकूण ३ ) अशा प्रकारे एकाच दिवशी १४ पॉझिटीव्ह पुढे आले आहेत. सर्व कोरोना संक्रमित नागरिकांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

आतापर्यत ८० बाधित बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे १४८ पैकी रूग्णालयात उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या आता ६८ झाली आहे. सर्व बाधितांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *