Big Breaking देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर यांचा अपघात.

राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या गाडीला अपघात झाला आहे. सुदैवाने हे दोन्ही नेते सुखरुप आहेत.  दिवंगत आमदार हरिभाऊ जावळे यांच्या घरी जाताना हा अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर हे दिवंगत आमदार हरिभाऊ जावळे यांच्या जळगावच्या घरी जात होते. त्याचवेळी गाडीचा ब्रेक फेल झाल्याने त्यांची गाडी समोरच्या गाडीवर आदळली. त्यामुळे हा अपघात झाला. सुदैवाने या दोघांनाही कोणतीही दुखापत झालेली नाही.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर विविध महापालिकांना भेट देत कोरोनाची परिस्थिती जाणून घेत आहेत. आज त्यांनी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे आज कोविड रूग्णालयाला भेट देऊन वैद्यकीय अधिकार्‍यांशी चर्चा केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *