राष्ट्रवादीत गेलेले ‘त्या’ पाच नगरसेवकांनी बांधले शिवबंधन.

अहमदनगर तेथील पारनेर येथील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून मोठा वाड निर्माण केला होता. या पाच नगरसेवकांच्या प्रवेशामुळे शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यातील वातावरण चांगलेच तापले होते. परंतु याच दरम्यान राष्ट्रवादी चे अध्यक्ष शरद पवार यांचे मातोश्रीवर जाणे, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये झालेला संवाद या सर्व घडामोडी नंतर अखेर त्या पाच नगरसेवकांनी आज पुन्हा शिवबंधन आपल्या हाती बांधले आहे.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी राष्ट्रवादीचा झेंडा घेऊन शिवसेनेला मोठा धक्का दिला होता. परंतु स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणावरून अजित पवार यांना फोन लावून नाराजी व्यक्त केली. तसेच आमचे नगरसेवक परत पाठवा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केल होतं त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांच्या उपस्थितीत पाचही नगरसेवक उपस्थित झाले. त्यानंतर त्यांना मातोश्रीवर नेण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर या पाचही नगरसेवकांनी पुन्हा शिवबंधन बांधले.

या सर्व घडामोडीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे मिलिंद नार्वेकर यांनी या प्रकरणात स्वतः लक्ष घातल्याने त्यांच्या मुत्सद्देगिरीला यश आलं आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *