उद्यापासून राज्यातील दुकानदारांना मिळणार २ तासांचा जास्त वेळ

राज्यातील दुकानदारांना मोठा दिलासा मिळणार असून उद्यापासून राज्यातील दुकाने आणि मार्केट खुली ठेवण्यासाठी दोन तास वाढवून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यातील कंटेन्मेंट झोन सोडून इतर क्षेत्रातील दुकाने ही सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत खुली ठेवता येतील, असे आदेश मुख्य सचिवांनी काल काढले आहेत. उद्या, गुरुवार ९ जुलैपासून ही संमती देण्यात आली आहे. आधीच्या आदेशात लागू करण्यात आलेले नियम कायम असतील. मिशन बिगिन अगेन टप्पा ५ अंतर्गत काल  यासंदर्भातील आदेश काढण्यात आले आहेत.

मुंबई महानगर क्षेत्रातील दुकांनाना सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत खुली ठेवण्यास संमती देण्यात आली होती. आता दुकानांवर होणारी गर्दी कमी करण्याच्या अनुषंगाने यासाठी दोन तास वाढवून देण्यात आले आहेत. मुंबई महानगर क्षेत्रातील महापालिका, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती आणि नागपूर या क्षेत्रात मिशन बिगिन अगेन टप्पा २ मध्ये मार्केट तसेच अत्यावश्यक नसलेल्या दुकानांना पी वन – पी टू बेसीस वर सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत खुली ठेवण्यास संमती देण्यात आली होती. आता दुकानांवर होणारी गर्दी कमी करण्याच्या अनुषंगाने यासाठी दोन तास वाढवून देण्यात आले आहेत. उद्या, ९ जुलैपासून हा नवा आदेश लागू करण्यात आला आहे.

सोशल डिस्टन्सिंग तसेच कोरोनासंदर्भात लॉकडाऊनच्या इतर नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. नियमांचे पालन न केल्याचे आढळल्यास किंवा गर्दी होत असल्याचे लक्षात आल्यास प्रशासनाकडून संबंधित दुकाने किंवा मार्केट बंद केली जातील. दुकाने किंवा मार्केटमधील गर्दी कमी करण्यासाठी या दोन तास वाढीव वेळेचा संबंधित मार्केट आणि दुकान मालक वापर करतील, राज्य शासनाने स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *