मोठी बातमी ! तीन महिन्यात कोरोनाची लस येणार ?

संपूर्ण जगाला त्रस्त करण्यार्यां कोरोनावर लस शोधण्यासाठी जगातील संपूर्ण देश प्रयत्न करीत आहे. त्याच पार्श्वभूमीवर भारत देखील कोरोनावर लस शोधण्यासाठी पाटण करीत होता. भारताच्या या प्रयत्नांना यश येत असल्याचे दिसून येत आहे.

भारताला सहा ते सात आठवड्यांमध्ये या प्रयत्नांना यश येईल, असा दावा केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी केला. एका वृत्त वाहिनीवरील कार्यक्रमात बोलतांना हा दावा केला आहे.

काही दिवसांपूर्वी भारतीय वैदयक संशोधन परिषदेने (ICMR) १५ ऑगस्टपर्यंत कोरोनवारील देशी लस विकसित होईल, असा अंदाज वर्तवाला होता. तसेच भारतातील दोन कंपन्यांनी विकसित केलेल्या कोरोना लसींच्या मानवी परीक्षणाला मंजुरी देण्यात आली आहे. ७ जुलैनंतर या प्रक्रियेला सुरुवात होईल. मात्र, इतक्या जलदगतीने परीक्षण करून लसीचा वापर करण्याबाबत भारतीय तज्ज्ञांमध्ये मतभेद आहे. 

या पार्श्वभूमीवर श्रीपाद नाईक यांनी केलेला खुलासा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. श्रीपाद नाईक यांनी म्हटले की, सध्या भारतात कोरोनाच्या चार-पाच लसींवर काम सुरु आहे. या लसींचे परीक्षण वेगवेगळ्या टप्प्यात आहे. आम्हाला याबद्दल माहिती मिळाल्यानंतर आयुष मंत्रालाकडून ती तपासण्यात आली. त्यानुसार तीन महिन्यांत कोरोनावरील लस विकसित होईल, असा अंदाज आहे. त्यापैकी एक महिन्याचा कालावधी पूर्ण झाला आहे. आता केवळ अंतिम टप्प्यातील गोष्टी बाकी असल्याचे श्रीपाद नाईक यांनी सांगितले.

पबजी गेमसाठी मुलाने उडविले चक्क १६ लाख रुपये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *