नीट जेईई परीक्षा पुन्हा समोर ढकळल्या, आता सप्टेंबर महिन्यात होणार परीक्षा.

इंजिनीअरिंग व मेडिकल च्या प्रवेशासाठी होणार्याय नीट जेईई (JEE, NEET) या दोन्ही परीक्षा दुसर्यां दा समोर ढकलण्यात आल्या आहे. देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता विद्यार्थ्याचा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून केंद्रिय मनुष्यबळ विकास मंत्रालयने हा निर्णय घेतला आहे.

नीटची २६ जुलैला होणारी परीक्षा आता १३ सप्टेंबर होणार आहे. तर जेईई मुख्य परीक्षा १८ ते २३ जुलैला होणार होती ती आता १ ते ६ सप्टेंबर आणि ॲडव्हान्स २७ सप्टेंबरला घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे या दोन्ही परीक्षांसाठी केंद्र बदलण्याची मुभा देखील विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे. ४ जुलै ते १५ जुलैच्या दरम्यान विद्यार्थी यासाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात.

देशभरातील १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेसाठी अर्ज केला आहे. या परीक्षेमार्फत देशभरातील महाविद्यालयांमध्ये प्रवेश देण्यात येतो. तर ९  लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी जेईई-मेंस परीक्षेसाठी अर्ज केला आहे. जेईई मेन्स परीक्षेमार्फत आयआयटी वगळता इतर इंजिनिअरिंग महाविद्यालयांमध्ये प्रवेश देण्यात येतो. जेईई मेन्स परीक्षा जेईई अॅडवान्स परीक्षेसाठी महत्त्वाची मानली जाते. जेईई अॅडवान्स परीक्षेमार्फत आयआयटीमध्ये प्रेवश देण्यात येतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *