येत्या ४८ तासात महाराष्ट्रात मुसळधार शक्यता.

राज्यात येत्या ४८ तासात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान वेधशाळेने दिलेल्या माहिती नुसार मुंबई आणि पश्चिम किनारपट्टीवर हा मुसळधार पाऊस कोसळणार आहे. या पावसामुळे आता मुंबईकरांना उकाड्यापासून सुटका मिळणार आहे. भारतीय हवामान विभागाने मुंबई आणि पश्चिम किनारपट्टीचा अंदाज घेतला आहे. पुढच्या ४८ तासांत मुसळधार पावसाचे इशारे दिले आहेत. मुंबईत साडे अकरापर्यंत चांगला पाऊस पडला, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.

मुंबईत दोन दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी मुंबईकरांना दोन दिवस घरातच राहण्याचा सल्ला दिला आहे. मुंबईसह ठाणे, पालघरला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे कुणीही विनाकारण घराबाहेर पडून नका, घरातच राहा, असं आवाहन मुंबई पोलिसांनी केलं आहे. मुंबई वगळता इतर महाराष्ट्र व विदर्भात  देखील मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *