कौतुकास्पद ! लॉकडाऊन मुळे हातचा व्यवसाय गेला, ढोकळ्याचे पीठ विकून सासू सुनेचे कमविले दीड लाख

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशात लॉक डाऊन घोषित करण्यात आले. त्यामुळे अनेक लोकांच्या हातातील काम गेले. अशीच परिस्थिती लातूर मधील दैवशाला शेटे आणि त्यांच्या सासूबाई सुरेखा शेटे यांच्यावर देखील आली. परंतु त्यांनी आपल्या ढोकळे बनविण्याच्या छंदाला लॉकडाऊनमध्ये व्यवसायाचं स्वरुप दिलं आहे. विशेष म्हणजे घरगुती ढोकळे बनविण्याच्या या छंदातून त्यांना तीन महिन्यात दीड लाखांचा नफा झाला आहे.

लातूरमधल्या दैवशाला शेटे आणि त्यांच्या सासूबाई सुरेखा शेटे या दोघींचं मुळात बांगड्या विकण्याचा व्यवसाय आहे. मात्र, लॉकडाऊनमध्ये बांगड्यांचा व्यवसाय ठप्प झाला आणि हातचं काम थांबलं. घरात छंद म्हणून सुनबाई चांगले ढोकळे बनवायच्या. मग, याच छंदाला त्यांनी व्यवसाय बनवायचे ठरवलं.
युट्यूबवरुन त्यांनी याबाबतची सर्व माहिती मिळवली. आता त्या घरातल्या मिक्सरवरुन ४५ प्रकारचे ढोकळे बनविण्याचे पीठ तयार करतात. व्यवस्थित पॅकिंग करुन त्यांनी आता मोठ्या मॉलमध्येही विक्रीला सुरुवात केली आहे.

आता त्यांना हा व्यवसाय वाढवायचा आहे. लॉकडाऊनच्या तीन महिन्यात त्यांना या ढोकळे पिठाच्या विक्रीपासून दीड लाखांचा निव्वळ नफा झाल्याचं त्या सांगतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *